Posts

युगंधरा - सुमती क्षेत्रमाडे

लेखिका सुमती क्षेत्रमाडे लिखित युगंधरा या कादंबरी चा थोडक्यात परिचय... दुसऱ्यासाठी जगणे हा स्त्रीचा नैसर्गिक पिंड आहे' ही भूमिका अक्षरशः जगणारी युगा... म्हणजेच # *युगंधरा*💫 🦋 👉शेजारच्या मुलीला स्वतःची लेक मानुन युगा ला सांभाळणारी माई(अभीची आई)... 👉दम्यासारख्या व्याधीने त्रस्त व मुलगी आपल्याला नेहमी विरोध करते असा गैरसमज करून आपल्या मुलीला आईची माया कधी लाभू न देणारी व प्रसंगी कार्टे, तुझा नायनाट होईल! असा शाप देणारी युगाची आई... 👉स्वाभिमानी, कठोर शिस्तीचे व आपल्या गुणवंत मुलीने शिक्षणासाठी मोठ्या शहरात जावे या साठी धडपडणारे नाना( युगाचे वडील) 👉बालपणीच्या मैत्रिणी सोबत अनेक स्वप्न रंगवलेली पण नंतर संसारात गुरफटलेली तरीही आपल्या मैत्रिणीच्या संवेदना जाणून असलेली सुलभा (युगाची शाळेपासूनची मैत्रीण) 👉आपल्या नवऱ्यावर युगा अजूनही प्रेम करते हे माहीत असताना देखील युगाला खरं समजून घेऊन तिची मैत्रीण बनलेली रुचिरा( अभी ची पत्नी)... 👉युगाच्या नकारामुळे संतप्त व व्यथित होऊन खरं कारण समजून न घेता केवळ अहंकारी व स्वार्थी युगाला धडा शिकविण्यासाठी संसार थाटणारा व युगा नेहमी स्मर

पालक अन् विद्यार्थी...

मित्रहो… नुकत्याच सर्व परीक्षा संपल्यात अन् त्यांचे result ही जाहीर झालेत. मित्रांनो, त्यातच 10वी अन् 12वीची परीक्षा म्हटलं की पालक,विद्यार्थी व सोबतच शिक्षक ही काळजीत असतात. एकवेळ परीक्षा देऊन पास होणं सोप्प असतं पण पुढे काय करायचं ? हा प्रश्न खरा डोकेदुखी वाढवतो. आणि हीच तर जीवनाची खरी परीक्षा असते! पालकवर्गाची नेहमी आकांक्षा असते की आपल्या मुलाने/मुलीने आपलं नाव उंचवायला हवं. आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा आपल्या मुलाने/मुलीने पूर्ण करायला हव्यात. इकडे विध्यार्थीवर्गाला त्यांची स्वतःची काही स्वप्न सत्यात उतरवण्याची धडपड असते. आणि हा निकालानंतरचा कालावधी सर्वांच्या डोक्याचा ताप होऊन येतो.     ही ती वेळ असते जेव्हा आपला फक्त एक निर्णय आपलं पुढचं आयुष्य ठरवणार असतो. आणि तो निर्णय जर आपण केवळ भावनांच्या आहारी जाऊन घेतला तर तो चुकण्याची अन् तुमचं भविष्य संकटात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून हा निर्णय घेताना सावधानपूर्वक व सर्वांगाने विचार करून घ्यायला हवा.          पालकांची इच्छा असते की त्यांच्या मुलाने/मुलीने चांगल्या ,मोठ्या, नामांकित कॉलेज ला admission घ्यावं. पण इ