युगंधरा - सुमती क्षेत्रमाडे
लेखिका सुमती क्षेत्रमाडे लिखित युगंधरा या कादंबरी चा थोडक्यात परिचय...
दुसऱ्यासाठी जगणे हा स्त्रीचा नैसर्गिक पिंड आहे' ही भूमिका अक्षरशः जगणारी युगा... म्हणजेच # *युगंधरा*💫
🦋
👉शेजारच्या मुलीला स्वतःची लेक मानुन युगा ला सांभाळणारी माई(अभीची आई)...
👉दम्यासारख्या व्याधीने त्रस्त व मुलगी आपल्याला नेहमी विरोध करते असा गैरसमज करून आपल्या मुलीला आईची माया कधी लाभू न देणारी व प्रसंगी कार्टे, तुझा नायनाट होईल! असा शाप देणारी युगाची आई...
👉स्वाभिमानी, कठोर शिस्तीचे व आपल्या गुणवंत मुलीने शिक्षणासाठी मोठ्या शहरात जावे या साठी धडपडणारे नाना( युगाचे वडील)
👉बालपणीच्या मैत्रिणी सोबत अनेक स्वप्न रंगवलेली पण नंतर संसारात गुरफटलेली तरीही आपल्या मैत्रिणीच्या संवेदना जाणून असलेली सुलभा (युगाची शाळेपासूनची मैत्रीण)
👉आपल्या नवऱ्यावर युगा अजूनही प्रेम करते हे माहीत असताना देखील युगाला खरं समजून घेऊन तिची मैत्रीण बनलेली रुचिरा( अभी ची पत्नी)...
👉युगाच्या नकारामुळे संतप्त व व्यथित होऊन खरं कारण समजून न घेता केवळ अहंकारी व स्वार्थी युगाला धडा शिकविण्यासाठी संसार थाटणारा व युगा नेहमी स्मरणात राहावी म्हणूनच मुलाचे नाव युगेश ठेवणारा अभि (युगा चा लहानपणापासून चा जिवलग मित्र)...
👉घराकडे अजिबात लक्ष न देणारा व वाईट मार्गाला लागलेला पण तरीही आईचा लाडका वसंत ... तर परिस्थितीचे गांभीर्य समजून न घेता केवळ स्वतःचा विचार करणारा अरुण (युगाचे मोठे भाऊ)...
:👇👇
👉अभ्यासात नेहमी प्रथम क्रमांकाने ऊत्तीर्ण होणारी, उचशिक्षणाची आस असलेली, रूपवान अन् गुणवान, संस्काराची पाळंमुळं खोलवर रुजलेली, बालपणापासूनची असलेली अभी ची ओढ अन् त्यातून निर्माण झालेलं त्याच्यावरच प्रेम वडिलांच्या इच्छेसाठी व त्यांनी पाहिलेल्या तिच्या यशस्वी जीवनाच्या स्वप्नासाठी प्रेमाला नाकारणारी, मोठ्या दोन्ही भावांनी घराची जबाबदारी झटकल्यामुळे घराला आधार देण्यासाठी मुलांप्रमाणे झटणारी, आईचे खोचक बोल मनाला न लावता तिची रात्रंदिवस सेवा करणारी , त्यासाठी स्वतःच्या सुखस्वप्नांचा - महत्वकांक्षांचा चुराडा करणारी आणि अखेरपर्यंत अंतरीची व्यथा अंतरीच ठेऊन आपली प्राणज्योत मालवणारी *युगा*....
अश्या प्रमुख पात्रांनी सजवलेली हृदयस्पर्शी कादंबरी प्रत्येकानेच वाचावी अशी..... # *युगंधरा* 🤗
Comments
Post a Comment