पालक अन् विद्यार्थी...
मित्रहो…
नुकत्याच सर्व परीक्षा संपल्यात अन् त्यांचे result ही जाहीर झालेत.
मित्रांनो, त्यातच 10वी अन् 12वीची परीक्षा म्हटलं की पालक,विद्यार्थी व सोबतच शिक्षक ही काळजीत असतात.
एकवेळ परीक्षा देऊन पास होणं सोप्प असतं पण पुढे काय करायचं ? हा प्रश्न खरा डोकेदुखी वाढवतो.
आणि हीच तर जीवनाची खरी परीक्षा असते!
पालकवर्गाची नेहमी आकांक्षा असते की आपल्या मुलाने/मुलीने आपलं नाव उंचवायला हवं. आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा आपल्या मुलाने/मुलीने पूर्ण करायला हव्यात.
इकडे विध्यार्थीवर्गाला त्यांची स्वतःची काही स्वप्न सत्यात उतरवण्याची धडपड असते.
आणि हा निकालानंतरचा कालावधी सर्वांच्या डोक्याचा ताप होऊन येतो.
ही ती वेळ असते जेव्हा आपला फक्त एक निर्णय आपलं पुढचं आयुष्य ठरवणार असतो. आणि तो निर्णय जर आपण केवळ भावनांच्या आहारी जाऊन घेतला तर तो चुकण्याची अन् तुमचं भविष्य संकटात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून हा निर्णय घेताना सावधानपूर्वक व सर्वांगाने विचार करून घ्यायला हवा.
पालकांची इच्छा असते की त्यांच्या मुलाने/मुलीने चांगल्या ,मोठ्या, नामांकित कॉलेज ला admission घ्यावं. पण इथे अडचण येते ती पैशांची..... मित्रानो, विध्यार्थी कितीही हुशार असला तरी त्याला पैशांची साथ लागते अन् जर पुरेसे पैसे नसतील तर त्याच्या हुषारीला किंमत नाही हे माझं स्वतःच प्रामाणिक मत आहे.
"पेराल तेच उगवेल" ही प्रख्यात म्हण आहे. अगदी त्याच प्रमाणे शिक्षण घेतांना आपण जेवढे पैसे टाकणार तितके किंवा त्याहून अधिकपटीने पैसे नंतर आपल्याला मिळतात. याचा अर्थ असा नाही की मुबलक donation भरून किंवा काही अवैध मार्गाने ऍडमिशन करायचं.
आता बघा MBBS ची फी कमीतकमी 50,000₹ समजू. तर MBBS ला जर विद्यार्थ्याचे admission झाले तर 4-5 वर्षांत तो विद्यार्थी लाखो रुपये कमवायला लागेल. (Based on his/her talent).
पण जर तोच विद्यार्थी जर साधी degree करणार असला तर त्याला कमीतकमी 500₹ इतकी फी लागेल. आणि 3 वर्षांनंतर त्यानां नोकरी मिळाली तर जवळपास 5-10,000₹ कमवेल.
माझं एवढेच सांगणं आहे की निर्णय घेतांना विद्यार्थी आणि पालक यांनी मिळून मार्ग काढायला हवा. केवळ विद्यार्थ्यांने स्वतःच बरोबर आहे असेही समजू नये आणि पालकांनी ही आपल्या निर्णयाचं दडपन विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनावर लादू नये। आणि या सोबतच पैशाचे गणित नीट करायला विसरू नये.
पालकांना माझी विनंती आहे की... आपल्या मुलाने/मुलीने ----₹ कमवावे अशी इच्छा असेल तर तेवढे पैसे पुरवा. आणि तुमच्या पाल्यात जर ते ध्येय गाठण्याची उमेद असेल तर ते नक्कीच पूर्ण होईल.
आणि
विध्यार्थी मित्रानो, तुम्हालाही माझी एक विनंती आहे... आपल्या आईवडिलांनी घामगाळुन पैसे जमविले असतात, तुम्हाला लहानच मोठ्ठ केलेलं असतं त्यांनी आपल्या वर खर्च केलेल्या एकणेक रुपयाची परतफेड करण्यासाठी आपण बांधील आहोत. तुम्ही तुमचे ध्येय त्यांना सांगा, तुमचे स्वप्न त्यांच्याजवळ मोकळे करा ते तुम्हांला कधीच निराश करणार नाही. ते त्यांच्या परीने होणारी सर्व मदत करायला ते एका पायावर तैयार असतात. तुम्ही फक्त त्यांचा भ्रमनिरास करू नका. मग बघा तुमचं आयुष्य कसं सुजलाम सुफलाम होत ते !!!!
-Kalyani Kalkate ✍ҜҜ☺
Plz. Comment ur views
ReplyDeleteChan😍👍👌🏻
ReplyDelete🙌👍💐👌
ReplyDelete